कणकवली : शहरातील टेंबवाडी परिसरात झालेल्या मटक्यावरील कारवाईनंतर विविध स्तरांवर चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे संबंधित ठिकाण हे शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही तेथे सुरू असलेल्या हालचालींबाबत वेळेवर माहिती कशी मिळाली नाही, याबाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, सध्या चर्चेत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा कथित गोमाता वाहतुकीशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जुना असल्याचे सांगितले जात असले तरी त्यासंदर्भात नेमकी कोणती चौकशी किंवा कारवाई करण्यात आली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणामुळे संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीबाबतही चर्चा सुरू झाली असून जबाबदार अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. व्हायरल व्हिडिओ आणि टेंबवाडीतील कारवाई या दोन्ही घटनांमुळे अनेक जुन्या विषयांची पुन्हा चर्चा रंगू लागली आहे.
त्या कर्मचाऱ्यावर अनेकदा निलंबनाची टांगती तलवार असताना देखील पाठीशी घालणारे ते अधिकारी कोण ? असा सवाल देखील उपस्थित केला जात असून यावर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक आणि अप्पर पोलीस अधिक्षक काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



