Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

श्रीलंकेने तब्बल २७ वर्षानंतर मालिका जिंकली ; भारताच्या फलंदाजांची हाराकिरी.

 कोलंबो: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका संपली आहे. श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेटवर 248 धावा केल्या होत्या. भारतापुढं विजयासाठी 249 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, पहिल्या दोन मॅचप्रमाणं तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांपुढं संघर्ष करताना पाहायला मिळाले. भारतीय संघ 138 धावांवर बाद झाल्यानं श्रीलंकेनं तब्बल 110  धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेपुढं भारतीय संघानं तब्बल 27 वर्षांनी एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावली आहे.

भारताचा दारुण पराभव

भारतीय संघ तिसऱ्या वनडेमध्ये पराभूत  झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली,रियान पराग आणि वॉशिंग्टनं सुंदर यांनी डावाची चांगली सुरुवात करुन देखील ते मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. शुभमन गिल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, शिवम बे, कुलदीप यादव यांना 10 धावांचा टप्पा देखील ओलांडता आला नाही. अखेर श्रीलंकेनं तिसऱ्या मॅचमध्ये भारताचा 110 धावांनी पराभव केला.

रोहित शर्मानं आज 35  धावा केल्या. विराट कोहली 20, रियान पराग 15 तर वॉशिंग्टन सुंदरनं 30 धावा केल्या.  भारताचे इतर फलंदाज दोन अंकी धावसंख्या देखील करु शकले नाहीत. त्यामुळं भारताला 110  धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

श्रीलंकेकडून दुनिथ वेल्लालगेनं 5 विकेट घेत भारताच्या टीमचं कंबरडं मोडलं. श्रीलंकेच्या फिरकीपुढं भारताच्या फलंदाजांना अपयश आलं.  भारतानं तब्बल 27 वर्षानंतर श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावली आहे. 1997 नंतर पहिल्यांदा श्रीलंकेनं भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली मॅच टाय झाली. यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये श्रीलंकेनं भारताला 32  धावांनी पराभूत केलं. तर, तिसऱ्या मॅचमध्ये भारताचा 110  धावांनी पराभव झाला.

भारताचे फलंदाज तिन्ही सामन्यात श्रीलंकेच्या फिरकीपटूंसमोर संघर्ष करताना पाहायला मिळाले. भारताचा संघ तिन्ही सामन्यात बाद झाला. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी भारताच्या 27 विकेट घेतल्या. वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे, चारिथ असलंका आणि जेफरी वेंडरसे यांनी भारताच्या फलंदाजीला सुरुंग लावला.

श्रीलंकेनं सनथ जयसूर्याच्या मार्गदर्शनात ही पहिला मालिका जिंकली आहे. भारतानं यापूर्वी 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावली होती. त्या मालिकेत सनथ जयसूर्याला ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ पुरस्कार देण्यात आला होता.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles