Wednesday, July 9, 2025

Buy now

spot_img

…… म्हणून बदल हवा तर आमदार नवा.! : गुणाजी गावडे. आमसभेविना पंधरा वर्षे मागे राहिलेला सावंतवाडी मतदार संघ!

सावंतवाडी : गेली तब्बल 15 वर्षे आमदार असणाऱ्यांनी सावंतवाडी मतदारसंघात एकच आमसभा घेतली. सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी महत्त्वाचा कणा असलेल्या आमसभेच्या बाबतीत विद्यमान आमदार अत्यंत बेफिकीर असल्याचे हे चित्र आहे. म्हणून आता ‘बदल हवा तर आमदार नवा’ असे वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी म्हटले आहे.

प्रत्येक मतदार हा लोकशाही शासन व्यवस्थेचा एकक असतो, या मतदारसंघातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदारांचा मतदारसंघ हा एक घटक असतो. आमदारांना यामुळेच शासन व्यवस्थेत प्रत्येक स्तरावर त्यांचे स्थान निर्माण होत असते. हे लोकप्रतिनिधी प्रत्येक स्तरावरील शासन व्यवस्था आणि मतदार संघातील जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपंचायत,नगरपरिषद, ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करीत असतात. सर्वसामान्य लोक आणि प्रशासन यांच्यातील दुवा असतात. मतदार संघातील सर्वसामान्य नागरिक व्यक्तिगत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांच्या मार्फत आपले म्हणणे अथवा समस्या, तसेच विकासात्मक बाबी आपल्या मतदारसंघातील आमदारांच्या माध्यमातून शासन व्यवस्थेपर्यंत पोहचवू शकतात. आमदारांना मतदार संघातील विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा स्थानिक विकास निधी (आमदार निधी) मिळत असतो. स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन त्यांच्या त्यांच्या मागणीनुसार विकास कामांसाठी हा निधी आमदारांमार्फत मतदार संघातील विकासात्मक कार्यासाठी दिला जातो. आमदार निधीतून मतदार संघातील जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत या पंचायत राज व्यवस्थेतील घटकांना करून देण्यासाठी आमसभा महत्त्वाची असते, विद्यमान आमदार गरजेनुसार हा निधी उपयोगात आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत असतो. तसेच आमदार हे जनसामान्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असल्याने लोकांचे विविध प्रश्न, विभागनिहाय स्थानिक समस्या, विकास कार्यक्रमव जनसामान्यांच्या सूचना या आमसभेच्या माध्यमातून ऐकून घेत असतो. आमदारांनी आमसभा घेणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी आमदारांचा आपल्या मतदारसंघात सतत संपर्क असणे गरजेचे असते. या आमसभेत प्रशासनातील जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल यांचे सहकार्य स्थानिक लोकांना कसे मिळते. याची चाचपणीही घ्यावी लागते. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विभागाचे जसे कृषी विभाग, वित्त व महसूल विभाग,आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महिला व बालकल्याण समिती, लघुपाट बंधारे विभाग, समाज कल्याण विभाग, एकात्मिक महिला व बालकल्याण विभाग, वनविभाग इत्यादी विभागांचे सहकार्य पंचायत राज व्यवस्थेत राहणाऱ्या सर्व नागरिकांना मिळते की नाही, हे देखील आमसभेच्या माध्यमातून पहावे लागते. वरील सर्व बाबींचा विचार करता सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग या तिन्ही तालुक्यातील लोकांना याचा अनुभव फारसा आलेला दिसत नाह. याचे कारण स्थानिक लोकप्रतिनिधींचा या मतदारसंघातील संपर्क म्हणावा तसा दिसला नाही. विद्यमान आमदारांनी पंधरा वर्षात फक्त एकच आमसभा घेऊन विकासासाठी काय योगदान दिले?, विकासातील कागदावरचे आकडे आणि त्याचा लाभ मतदार संघात किती झाला? हे अनाकनीय कोडे आहे. हे जनता समजून आहे. स्थानिक असूनही सतत मतदारसंघाच्या बाहेर राहून फक्त कार्यक्रमापुरते चमकोगिरी करणाऱ्या आमदारांचा आमसभेच्या परीक्षेचा निकाल हा अनुत्तीर्ण आहे. म्हणून सतत जनसामान्यांची संपर्क ठेवणारा आमदार सावंतवाडी या मतदारसंघात असणे गरजेचे आहे, ‘बदल हवा तर आमदार नवा !’ असे वेत्ये सरपंच
गुणाजी गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles