देवगड : महाराष्ट्र राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राबवून महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट केल्याबद्दल धन्यवाद व आभार प्रकट करण्यासाठी तेजस्वी महिला ढोल ताशा पथकामार्फत आयोजित ‘एक राखी लाडक्या भावासाठी’ या उपक्रमा अतंर्गत देवगड तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राख्या पाठविण्यात आल्या होत्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या महीला प्रतिनिधीनीं विशेष मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचा सत्कार व सन्मान सोहळा संस्थेमार्फत सावित्री इटरनॅशनल स्कूल पडेल येथे नुकताच करण्यात आला. तसेच पडेल विभागातील व आजूबाजूच्या इतर गावातील महिलांच्या मागणीवरुन तेथील महिलांसाठी तेजस्वी ढोल ताशा पथका मार्फत ढोल ताशाच्या उपक्रमाची सुरुवात सावित्री इटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यामाने सोहळ्या मार्फत करण्यात आली.

यावेळी तेजस्वी महिला ढोल ताशा पथकाने ढोल ताशाचे प्रात्यक्षिक देखील सादर केले. कार्यक्रमाला श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे, भारतीय नौसेना अधिकारी मंगेश दळवी, संस्था अध्यक्ष चंद्रकांत घाडी, लक्ष्मी नारायण फांऊडेशनचे विश्वस्त संतोष दळवी, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र मेस्री, सुनील कामतेकर, प्रदीप मुणगेकर , खुडी माजी सरपंच सौ. मनाली मुणगेकर, सावित्री इटरनॅशनल स्कूल संचालिका श्रीमती. रेडकर मॅडम , जिल्हा ग्रामसेवक संघटना महिला उपाध्यक्ष सौ. प्रांजल शेटगे, सेंटल ऐक्साईज सेवा निवृत्त कर्मचारी वसंत कोकम, ज्येष्ठ महीला प्रतिनिधी सौ. मिनाक्षी कोकम, सौ. दिपीका मुणगेकर, तसेच तेजस्वी महीला ढोल ताशा पथक प्रतिनिधी सौ. प्राजोल राणे, सौ. सोनाली गावकर, व इतर वादक उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवर यांनी महिला प्रतिनिधी यांचे अभिनंदन केले व अध्यक्ष श्री चंद्रकांत घाडी यांनी संस्थेची वाटचाल सर्वांसमोर ठेवली.


