वैभववाडी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी वैभववाडी तालुक्यातील व्यापारी बांधवांची भेट घेत संवाद साधला. तसेच तालुक्यातील ज्येष्ठ व्यापाऱ्यांचे आमदार नितेश राणे यांनी आशीर्वाद घेतले.
कोकिसरे येथील महालक्ष्मी हॉलमध्ये वैभववाडी तालुक्यातील व्यापारी बांधवांची बैठक पार पडली. यावेळी आ. नितेश राणे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही माझी आहे. उर्वरित विकास कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. २० नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्व व्यापाऱ्यांनी मला मतदान करून मतदान करून आशीर्वाद द्यावेत असे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ व्यापारी शांताराम काका रावराणे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तेजस आंबेकर, माजी अध्यक्ष मनोज उर्फ बंड्या सावंत, श्री घोणे मामा, संतोष कुडाळकर, सुरेंद्र नारकर, श्री तुकाराम प्रभू, नितीन कदम, मनोज मानकर, दिलीप मोरे, मनोहर फोंडके, मंगेश चव्हाण, लालू पटेल, संजय साळसकर, नितीन महाडिक, रत्नाकर कदम, रवींद्र पाटील, संतोष कोलते, संजय लोके, श्री कुंभार, श्री पाथरे, गणेश भोवड, शेखर नारकर, गंगाधर केळकर, सत्यवान पाटील, श्री प्रभूलकर, श्री कुबडे, गणेश मोहिते, श्री रामचंद्र बावदाने, तुकाराम देवासी, प्रल्हादसिंग, बंड्या गाड, श्री पारकर, श्री हवालदार, व अन्य व्यापारी बांधव उपस्थित होते.
या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, नासीर काझी, भालचंद्र साठे, प्राची तावडे, मंगेश गुरव, नेहा माईणकर, संजय सावंत, डॉ. राजेंद्र पाताडे , बबलू रावराणे, हुसेन लांजेकर उद्योजक विजय तावडे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी वैभववाडीतील व्यापाऱ्यांशी साधला संवाद. ; वैभववाडी तालुक्यातील मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


