Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

योद्धा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो हा इतिहास.! ; माझ्यावरील पेड बदनामीकारक व्हिडीओना उत्तर देण्यात आज वेळ फुकट घालणार नाही : विशाल परब यांनी स्पष्ट केली भूमिका.

माझी उमेदवारी हा मागील १५ वर्षात उपेक्षित ठेवलेल्या जनतेचा लढा, बदनामीमागच्या सूत्रधारांना जनता मतपेटीतून उत्तर देणारचं! – अपक्ष उमेदवार परबांचा विश्वास. 

सावंतवाडी : मी कोणावरही व्यक्तिगत टीका करत नाही त्याप्रमाणे व्यक्तिगत केला महत्त्व देत नाही. माझा लढा कोणाच्याही विरोधात नसून गोरगरीब जनता, माझ्या मायमाऊली, बेरोजगार युवावर्ग आणि परिवर्तनासाठी जीव तोडून लढा देणारे कार्यकर्ते या सगळ्यांसाठी आहे. जनतेसाठी लढण्यापासून मला प्रवृत्त करण्यासाठी अनेक ऑफर देण्यात आल्या, धमक्याही देण्यात आल्या. मात्र मी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला शरण आलो नाही. जेव्हा योद्धा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो, हा इतिहास आपणा सर्वांना माहीत आहे. माझा जनतेवर आणि जनतेचा माझ्यावर असणारा विश्वास अतूट आहे, मी जनतेच्या घरातील उमेदवार आहे. असल्या बदनामीच्या पेड मोहिमांमुळे आमच्या नात्यावर कोणताही परिणाम होणार नाही म्हणूनच असल्या बदनामीकारक आरोपांना उत्तर देण्यात मी माझा वेळ फुकट घालवणार नाही. यांच्या षड्यंत्राला आणि बदनामीमागच्या सूत्रधारांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनताच उत्तर देईल, असा विश्वास भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles