Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता.!

सावंतवाडी : विवाहितेस मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वेताळ बांबर्डे येथील इंद्रजित तानाजी चव्हाण याची ओरोस येथील अतिरिक्त जिल्हान्यायालयाने आजरोजी निर्दोष मुक्तता केली.या प्रकरणी आरोपी तर्फे ॲड. अनिल निरवडेकर यांनी काम पहिले.

वेताळ बांबर्डे येथील एका विवाहितेस तिचा दीर इंद्रजित तानाजी चव्हाण हा वारंवार मानसिक त्रास देत होता. सदर विवाहित ही आजारी असल्याने तिला घरातील कामे करण्यास ती असमर्थ असल्याने तिला कामे करणे त्रास होत असे त्या रागातून तिचा दीर तिला वारंवार त्रास देत असे. फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे विवाहितेच्या आत्महत्ये दिवशी तिच्या आरोपीचे व तिचे मोठे भांडण झाले व आरोपी तिच्या मागे कोयता घेऊन मारण्याकरीता धावून आला. त्या घटने नंतर पीडित महिला तिच्या माहेरी आली व तिने ऊसाच्या रस मधून उंदीर मरण्याचे औषध घेतले व आत्महत्या केली. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी याच्या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेने आत्महत्या केली असा त्यांनी दावा केलेला, त्यानुसार आरोपी याच्या विरुद्ध १९ मार्च २०२० रोजी कुडाळ येथील पोलीस ठाणे येथे आरोपी याच्या विरुद्ध भा.द.वि. कलम ३०६ व ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आरोपी याला अटक करण्यात आलेलेली होती. आरोपी याच्या विरुद्ध ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात खटला चालविण्यात आला. याकामी अभियोग पक्षाकडुन एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. तपासादरम्यान साक्षीदारांच्या जबाबात असलेला दोष,साक्षीदारांचा उलट तपास,पोलीस तपासादरम्यान असलेला दोष, अशा प्रकारचे दोष सरकारपक्ष पुराव्यांसहित साबीत न करू शकल्याने,त्याचा फायदा देवून सबळ पुराव्याअभावी तसेच ॲड. निरवडेकर यांचा अंतिम युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी याची ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश साहेब श्रीम. व्ही. एस. देशमुख यांनी आरोपी याची निर्दोष मुक्तता केली. याकामी आरोपी तर्फे ॲड. अनिल निरवडेकर,ॲड. गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles