कणकवली : येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेची विद्यार्थीनी कुमारी भक्ती कांदळकर हिने विभागीय क्रीडा स्पर्धेत ‘कराटे’ या खेळ प्रकारात १४ वर्षाखालील मुलींच्या गटात ३८ व ४२ किलोग्रॅम या गटात क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर आयोजित कोल्हापूर विभागीय कराटे स्पर्धेत ब्राँझ मेडल प्राप्त करून यशाची भरारी मारली.
प्रशालेचे क्रीडा शिक्षक अच्युत वणवे व सुदिन पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले. कु भक्ती कांदळकर हिचे अभिनंदन प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी केले तसेच पर्यवेक्षिका वृषाली जाधव यांनीही अभिनंदन केले. कु. भक्ती कांदळकर हिचे कौतुक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव श्री.वळंजू व सर्व संस्था पदाधिकारी यांनी केले .