वेंगुर्ला : डिसेंबर महिन्यात कोकणातील जत्रोत्सव सुरू झाला आहे.आपल्या दक्षिण कोकणातील पंढरीचा राजा म्हणून ओळखला जाणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आसोली गावाचे सुप्रसिद्ध ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिरात श्रीदेवी खाजनादेवीचा जत्रोत्सव उद्या शुक्रवार दिनांक ६ डिसेंबर तसेच शनिवार दिनांक ७ डिसेंबरला श्री देवी भूमिका देवीचा जत्रोत्सव भूमिका देवी मंदिरात असून या वर्षीही विविध कार्यक्रम होणार आहेत.नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वत्र देवीची कीर्ती आहे तसेच आसोली गाव आणि पंचक्रोशीत ही जत्रा मुलींची जत्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे.
या दिवशी सकाळपासून देवीची ओटी भरणे वगैरे कार्यक्रम तसेच रात्री पारंपरिक दशावतार नाट्य कंपनी आरोलकर यांचा दणदणीत दशावतारी नाट्य प्रयोगही सादर होणार आहे.तरी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा आणि
विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकर, मानकरी, ग्रामस्थ मंडळी आणि श्री देव नारायण देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
ADVT –



