नितीन गावडे
सावंतवाडी : तालुक्यातील आरोस येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार ९ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे.त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत.सकाळी श्रींची पूजाअर्चा व अभिषेक होईल.त्यानंतर देवीची ओटी भरणे,केळी ठेवणे,नवस बोलणे,फेडणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल.रात्री देवीची सवाद्य पालखी प्रदक्षिणा व मध्यरात्री वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोस मानकरी व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
ADVT –