सावंतवाडी: मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ मधील कलम १२ अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करणे हा राज्य मानवी हक्क आयोगाचा महत्वपूर्ण अविभाज्य भाग आहे. सदरील कायद्याअंतर्गत समाजातील तळागाळातील जनतेला मानवी हक्काचे ज्ञान माहित होणे व त्याबद्दल जनजागृती होण्यासाठी १० डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यु.कॉलेज सावंतवाडी प्रशालेत मानवी हक्क दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अभय केंद्र सावंतवाडीच्यावतीने ॲड. नम्रता श्रीराम नेवगी यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये मानवी हक्क कायद्याविषयी विद्यार्थी म्हणून आपली कर्तव्य व जबाबदाऱ्या विविध न्यायालयीन प्रकरणांचा दाखला देऊन माहिती देण्यात आली.”हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे ” या प्रार्थनेचा अर्थ सांगून आणि प्रार्थनेचे गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमास अभय केंद्र सावंतवाडीच्या श्रीम. स्नेहा बगळे , रोहन सैंदाणे , प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापक श्रीम. कशाळीकर, पर्यवेक्षक श्री. पाटील, शिक्षक – विद्यार्थी उपस्थित होते.
‘RPD’ प्रशालेत ‘मानवी हक्क दिन’ साजरा.!
0
36