Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

‘पोलीस रेझिंग डे’ निमित्त वैभववाडी महाविद्यालयात मार्गदर्शन.!

वैभववाडी : महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापनेचे औचित्य साधून दिनांक २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने वैभववाडी पोलीस स्टेशन ठाणे आणि आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी महविद्यालयात पोलीस रेझिंग डे निमित्त मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. वैभववाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी पोलिसांच्या वापरात असलेल्या विविध बंदुका, रायफल, अश्रू बॉम्ब अशा विविध शस्त्रास्त्रे यांची माहिती तसेच पोलीस स्टेशनमधील कामकाज, गुन्हे, त्याचा तपास तसेच पोलीस स्टेशनमधील दैनंदिन कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली. सर्वांना सर्वतोपरी सुरक्षा पुरवून सगळीकडे शांतता ठेवण्याचे काम पोलीस विभागाकडून केले जाते.

विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या याबाबतसुद्धा विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, उपप्राचार्य डॉ.एम.आय.कुंभार, पोलीस उपनिरीक्षक किरण घाग,कार्यालयीन अधीक्षक संजय रावराणे, प्रा. ए. एम.कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी व पोलीस स्टेशनमधील कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.विजय पैठणे आणि कार्यक्रमाचे आभार प्रा.रमेश काशेट्टी यांनी मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles