सावंतवाडी : लेफ्टनंट कर्नल श्रीमंत शिवरामराजे भोंसले – राजेसाहेब यांची 97 वी जयंती उद्या मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता एसपीके महाविद्यालयामध्ये ‘संस्थापक दिन’ म्हणून साजरी होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमंत खेमसावंत भोसले – राजबहादुर भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे उपस्थित राहून ‘पर्यावरण आणि स्वच्छता’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या चेअरमन श्रीमंत शुभदादेवी भोंसले – राणीसाहेब, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे लखमसावंत भोंसले, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी, नियमक मंडळ सदस्य व सर्व सभासद, आणि प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले आहे.


