Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

Big Breaking – वाल्मिक कराडची प्रकृती खालावली.

बीड : अखेर वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली मात्र त्याच दरम्यान त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडला मकोका लागताच त्याचा ताबा घेण्यासाठी एसआयटीनं न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून एसआयटीला वाल्मिक कराडचा ताबा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता उद्या त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

दरम्यान त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. याचदरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्यानं वैद्यकीय चाचणीवेळीच त्याचा ईसीजी काढण्यात आला आहे. 

दिवसभरात नेमकं काय घडलं?

आज वाल्मिक कराड याची सीआयडी कोठडी संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. पुन्हा एकदा त्याच्या सीआयडी कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयानं मागणी फेटाळत त्याला न्यायालयीन कोठडी दिली. मात्र त्याचवेळी त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर हत्याप्रकरणात त्याचा ताबा घेण्यासाठी एसआयटीनं न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून एसआयटीला वाल्मिक कराड याचा ताबा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. दरम्यान त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली, यावेळी त्याची प्रकृती बिघडल्यानं त्याचा ईसीजी काढण्यात आला आहे.

परळीमध्ये आंदोलन पेटलं –

आज सकाळपासूनच वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ परळीमध्ये समर्थकांचं आंदोलन सुरू होतं. पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं. यावेळी एका आंदोलकाला भोवळ आल्याची देखील घटना घडली. मात्र जेव्हा कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्याची बातमी समोर आली तेव्हा कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. बेमुदत परळी बंदची हाक देण्यात आली. टायर जाळून निषेध करण्यात आला. तर एका ठिकाणी बसवर देखील दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

ADVT – 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles