नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील ऑलिम्पिक स्पर्धेत दोन वेळा पदकं पटकावणार भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने लग्न केलं आहे. समाजमाध्यमावर लग्नाचे फोटो अपलोड करून त्याने याबाबतची माहिती त्याच्या समस्त चाहत्यांना दिली आहे.
नीरज चोप्राने लग्न केल्याची माहिती त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाची चर्चा होती. त्याच्या पत्नीचे नाव हिमानी असे आहे.