Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘राम कृष्ण हरी, आता वाजवा तुतारी.!’ – अर्चना घारेंनी फुंकले रणशिंग, जाणीव जागर यात्रेला आजपासून झाली सुरुवात. ; रेडी, शिरोडा, आजगाव, धाकोरा, आरवली परिसरात पहिल्या दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

वेंगुर्ला : ‘जाणीव आपल्या शक्तींची, जागर आपल्या हक्कांचा.!’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ‘जाणीव जागर यात्रे’ला आजपासून सुरुवात झाली. वेंगुर्ला तालुक्यातील जगप्रसिद्ध असलेल्या रेडी येथील श्री गणपतीचे दर्शन घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रॅलीचा प्रारंभ झाला. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विधीवत उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर रेडी येथील माऊली मंदिर तसेच विविध परिसरातून जोरदार घोषणाबाजी देत रॅली शिरोडाकडे निघाली. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे – परब, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. रेवती राणे, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, महिला तालुकाध्यक्ष दीपिका राणे, सोशल मीडिया कोकण विभागीय अध्यक्ष सचिन पाटकर, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, वेंगुर्ला कार्याध्यक्ष सुशांत कोसुलकर, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जहूर खान, महिला तालुकाध्यक्ष मारीत फर्नांडिस, महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, पूजा दळवी, तौसीफ आगा, मनोज वाघमोरे, युवक तालुकाध्यक्ष ऋतिक परब, सावंतवाडी विधानसभा समन्वयक राजू भगत, नंदू मांजरेकर, रेडी येथील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे मिठाचा सत्याग्रह. शिरोडा येथे झालेल्या मिठाच्या सत्याग्रहाच्या ऐतिहासिक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेते व पदाधिकारी यांनी पुष्प वाहिली आणि स्वातंत्र्य समरातील आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना नमन केले. यानंतर शिरोडा येथील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक व शिरोडा परिसर रॅलीने दुमदुमून निघाला. यावेळी ‘राम कृष्ण हरी, आता वाजववा तुतारी’, ‘दादा नको, नको भाई, आता हवी फक्त हक्काची ताई.!’, ‘अर्चनाताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.!’ अशा जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले.

मोटारसायकली तसेच गाड्यांचा ताफा सोबतचं कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण घोषणा यांनी रॅलीने संपूर्ण शिरोडा परिसर दणाणून सोडला. त्यानंतर आजगाव येथील श्री देव वेतोबा मंदिरात देवाचे दर्शन घेण्यात आले. तसेच तेथील विविध महिला पदाधिकारी तथा बचत गटाच्या विविध महिला भगिनी यांनी अर्चना घारे-परब तसेच महिला पदाधिकारी यांचे औक्षण करून त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी देवस्थान समितीचे मुख्य श्री. प्रभू, तसेच श्री. पांढरे यांनी रिवाजाप्रमाणे अर्चना घारे व पदाधिकारी यांचे स्वागत केले. यानंतर धाकोरा, आरवली या गावांतून रॅली मोठ्या उत्साहात निघाली.

दरम्यान शिरोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, आमची महाविकास आघाडी घट्ट आहे. आम्ही ‘इंडिया आघाडी’ म्हणूनच अर्चना घारे यांना मैदानात उतरवणार आहोत. आमचा लढा हा अन्याय, अत्याचार आणि आजपर्यंत विकासापासून दूर ठेवणाऱ्या आणि केवळ घोषणाबाजी करणाऱ्या विद्यमान आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे येथील सुज्ञ मतदार आता नक्कीच जागर रॅलीच्या माध्यमातून अंतर्मनातून जागृत होतील व आम्हा साथ देतील, अशी आशा आहे.

यावेळी अर्चना घारे -परब म्हणाल्या, आम्ही जाणीव जागर रॅलीची ऐतिहासिक सुरुवात शिरोडा सत्याग्रह ठिकाणापासून करतोय. कारण ह्या भूमीला एक इतिहास आहे. इंग्रजांसारखी बलाढ्य शक्ती की, ज्यांच्या साम्राज्यात म्हणे सूर्य कधी मावळतच नव्हता. अशा शक्तीला आव्हान देऊन, आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्यसैनिकांनी मूठभर मीठ उचलून आपले हक्क प्राप्त करून घेतले आणि मिठाचा सत्याग्रह म्हणून एक इतिहास घडला. ज्या ठिकाणी हा संघर्ष झाला, सत्याग्रह झाला, त्यापैकी एक ठिकाण म्हणजे शिरोड्याची भूमी ! आणि म्हणून मुद्दामहून आम्ही यात्रेची सुरुवात शिरोड्याच्या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीतून करतोय. आमचे हक्क प्राप्त करण्यासाठी शांततेच्या, अहिंसेच्या आणि संविधानिक मार्गाने आम्ही प्रयत्न करू. या यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करून या व्यवस्थेला जागे करू. जाग आणण्याचा काम करू. मला तमाम सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना सांगायचे आहे. आम्ही आपल्या गावी आपल्या वाडीवर, आपल्या वस्तीवर, आपल्या हक्कांचा जागर करण्यासाठी आपल्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी जाणीव जागरण यात्रेच्या निमित्ताने आजपासून येत आहोत. आपणही मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.

पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री प्रवीण भोसले म्हणाले, गेल्या पंधरा वर्षापासून सावंतवाडी मतदारसंघाचा विकास ठप्प आहे. शिक्षणमंत्री मात्र घोषणाबाजी करण्यात दंग असून येथील नागरिकांच्या हाती काहीही आलेले नाही. युवक बेरोजगार आहेत. कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार बांधव यांचे प्रश्न गंभीर आहेत. शिक्षणाचे तीन तेरा वाजवले आहेत. आणि विशेष म्हणजे येथील शेतमालाला हमीभाव नाही. या सर्व अन्यायाविरुद्ध आता पेटून उठण्याची गरज असल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले.

दरम्यान पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या जाणीव जागर रॅलीला संपूर्ण रेडी, शिरोडा, आजगाव, धाकोरा या परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी महिला भगिनींचा उत्साह अत्यंत प्रेरणादायी होता. यावेळी युवक व महिलांच्या बोलक्या प्रतिक्रिया तसेच आबालवृद्धांच्या बोलक्या प्रतिक्रिया पाहून अर्चना घारे अनेकदा भारवल्या आणि त्यांनी नागरिकांचे विशेष आभार मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles