कळवा (ठाणे) : ठाणे येथे नुकत्याच बेडेकर कॉलेजच्या श्रीमंत पेशवाई हॉलमध्ये संपन्न झालेला २०२५ चा ‘प्रिन्स अँड प्रिन्सेस स्टार महाराष्ट्र’ हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरुपात व उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून बालकांनी सहभाग घेतला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कलाकार दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर उपस्थित होते. तसेच मुख्य तपासी अधिकारी (अँटिपायरसी सेल -मुंबई ), जितू गुप्ता सर, 2024 च्या मिसेस सौ. हर्षाली आणि सौ जीविका, श्री. केवल घाला ( कास्टिंग डायरेक्टर), श्री. मंदार काने (प्रोडूसर) तसेच अस्मि फाउंडेशनच्या दिपाली लिमये आणि रजनी भट आदि उपस्थित होत्या.
संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो मुलांनी यावेळी सहभागी होत स्पर्धेत रंगत आणली. या स्पर्धेत कळवा येथील रायझिंग स्टार शाळेच्या मुलांचे सादरीकरण अत्यंत वाखण्याजोगे होते. 2025 ची रायझिंग स्टार स्कूलची विद्यार्थिनी प्रिन्सेस प्रथम क्रमांकाने कुमारी त्रिशा बारस्कर (वय वर्षं ४) ही ठरली. तर त्याच शाळेची रणरअप कु.अरवी सुतार (वय वर्ष 3) ही ठरली.
मुलांमध्ये प्रिन्ससुध्दा रायझिंग स्टार स्कूलचा प्रथम क्रमांक कु. क्रिशू भोईर (वय वर्षे 10) तसेच छोट्या गटांमध्ये फर्स्ट रणरअप विद्ववान शेट्टी ( वय 5 वर्षे )व सेकंड रनरअप क्रिशू चव्हाण (वय 5 वर्षे) तसेच प्रिन्सेस ऑफ बेस्ट एटीट्यूड कु. अंशिका भाष्टे, प्रिन्सेस ऑफ बेस्ट डॅझेलिंग स्माईल कु. कुशाग्री मयेकर, बेस्ट फॅशन आयकॉन श्रेयस सूर्यवंशी तर बेस्ट आयकॉन गर्ल अरुनिता प्रजापती या सर्व रायझिंग स्टार स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे सगळीकडे कौतुक होत आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या चिमुकल्या हिर्यांना योग्य असे पैलू पाडणाऱ्या रायझिंग स्टार शाळेच्या उपक्रमशील आणि अत्यंत सजग अशा प्रयोगशील मुख्याध्यापिका ममता मसूरकर व त्यांच्या शाळेचे व शिक्षकांचेही योगदान अनन्यसाधारण असल्यामुळे सर्व स्तरांवर त्यांचे खूप कौतुक होत आहे. आजच्या पिढीला खूप संस्कारशील घडवण्याचा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, वेगवेगळ्या स्तरांवर स्वतः ममता मसूरकर मॅडम मुलांना घेऊन जात असतात व त्यांच्या या कौतुकाचं संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक मान्यवर कौतुक करत आहेत.
ADVT –