Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

गोर्‍यांना ‘क्लिन स्वीप’, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज!

अहमदाबाद : भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडचा 3-0 ने पराभव केला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. या सामन्यात भारताची सुरुवात अडखळत झाली. अवघी एक धाव करून रोहित शर्मा बाद झाला. पण त्यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी मोर्चा सांभाळला. शुबमन गिलने वनडे क्रिकेटमधील सातवं शतक ठोकलं. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी चांगल्या फॉर्मात असल्याचं दाखूवन दिलं. विराट कोहलीला शेवटच्या सामन्यात सूर गवसला. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. श्रेयस अय्यरनेही मधल्या फळीत चांगली फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं. भारताने 50 षटकात सर्व गडी गमवून 356 धावा केल्या आणि विजयासाठी 357 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही इंग्लंडला गाठता आलं नाही. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने पराभव सहन करावा. इंग्लंडने षटकात सर्व गडी गमवून 214 धावा केल्या. भारताने तिसरा सामना 142 धावांनी जिंकला.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles