सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. आपल्या सर्वांच्या पक्ष प्रवेशाने तो अजून मजबूत झाला आहे. येत्या काळात आम्हाला सर्वांना हातात हात घालून एकत्रपणे काम करण्याची गरज आहे.भाजपचा बालेकिल्ला अधिक मजबूत करायचा आहे, असे मार्गदर्शन करत भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.तर आगामी निवडणुकांमध्ये महायुती सोडून अन्य कोणीही सत्तेत येणार नाही असे काम करा! या जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप निर्माण करा असे आवाहन मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
भाजपा कुडाळ तालुका कार्यकर्ता मेळावा ओरोस येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगांवकर, रणजीत देसाई, संध्या तेरसे, राजू राऊळ, महेश सारंग, प्रमोद रावराणे, बाबा मोंडकर, संदीप साटम, अशोक सावंत, बाळा खडपे, सुप्रिया वालावलकर, कानडे, पप्या तवटे, मोहन सावंत, चेतन चव्हाण, आफ्रिन करोल, भाई सावंत, गोपाळ हरमलकर, संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित.
भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष असला पाहिजे ही जबाबदारी आपल्या सगळ्या जणांची असली पाहिजे. कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नको. महायुती याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महायुतीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, मात्र विरोधकांना दूर ठेवणार विकास हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा तुम्हालाही न्याय देऊ गावातील विकासाला साथ देऊ असेही मंत्री नितेश राणे यांनी जाहीर केले. जिल्हा नियोजनचा विकास निधी असो किंवा थेट सरकारचा निधी असो हा विकास निधी महायुतीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गावात प्राधान्याने जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
भाजपाचे नेते रवींद्रजी चव्हाण यांनाही मंत्री नितेश राणे यांनी विनंती केली! येणाऱ्या निवडणुका आपण शतप्रतिशत भाजपच्या दिशेने आपण लढऊ. आपला कार्यक्रम स्पष्ट असतो. महायुती सोडून मैत्रीपूर्ण लढती लढू. सत्तेत येताना महायुती म्हणून एकत्र बसू.या जिल्ह्यात शत प्रतिशत भाजप निर्माण करूया, असे आवाहनही मंत्री नितेश राणे यांनी केले.
रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन –
येणाऱ्या काळामध्ये सिंधुदुर्ग असेल किंवा महाराष्ट्रातील असणारा प्रत्येक जिल्हा हा प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर कसा होईल यासाठी काम करणे आवश्यक आहे. ते कसं करता येऊ शकतं आणि पारदर्शकता कशी असली पाहिजे या सगळ्या गोष्टीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष घालत आहेत. एक कणखर नेतृत्व महाराष्ट्राला पुन्हा एकदा मिळाले आहे .2014 ते 2019 महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर होता येणाऱ्या काळामध्ये ही हे राज्य नंबरवन असेल या साठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आत्ताच ते जेव्हा दावसला गेले होते तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही आपल्या महाराष्ट्रासाठी आणण्याचं काम केलंय. मी नितेश जी आणि यांच्याबरोबर असणारे प्रत्येक जण त्यांना विचार केला की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी कशा प्राप्त होऊ शकतील? यासाठी विशेष लक्ष ही सर्व मंत्रिमंडळातील असणारी सर्व मंडळी घालत आहेत. त्यामुळे मला खात्री आहे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो पर्यटनाच्या असणाऱ्या अनेक संधी या ठिकाणी कशा उपलब्ध होतील एवढेच नाही तर एक ना अनेक असे विषय हे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या आणि आदरणीय राणेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळतील. राणेसाहेबांचा असणारा अनुभव देवेंद्रजींचा असणारा अनुभव या सगळ्या गोष्टी आणि पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांचा या जिल्ह्यामध्ये विकासाचा जो प्रवास होणार आहे .तो आपण सराव आपल्या डोळ्यांनी पाहणार आहोत.नितेश राणे हे जरी सिंधुदुर्गाचे पालकमंत्री असले तरी सह पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा आहे. कुणीही कोणतीही चिंता करायची गरज नाही. आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये नाहीतर परिवारामध्ये प्रवेश केलेला आहे.भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा असणारा परिवार आहे. या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये त्यांच्याबरोबर सहभागी होणारे आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते या पक्षांमध्ये काम करतात त्यामुळे तुम्ही चिंता करू नका येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावातील असणारा विकास असेल आपल्याला असणाऱ्या प्रत्येक अडचणी असतील या अडचणी बरोबर भारतीय जनता पार्टी एक कुटुंब म्हणून आपल्याबरोबर राहील हे मी आपणा सर्वांना आश्वासित करतो आणि बिनधास्त रहा. ज्या पक्षातून तुम्ही या पक्षातून भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये प्रवेश केलाय मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आपल्याला एक चांगला अनुभव भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये काम करत असताना कार्यकर्ता म्हणून मिळेल . खासदार नारायण राणें मंत्री नितेश राणे,जिल्हाध्यshj प्रभाकर जी,असतील या सर्वांच्या नेतृत्वामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला आपल्याला सर्वांना कुटुंब म्हणून सामावून घेतलं पाहिजे याची आम्ही सर्वजण स्वतः लक्ष देऊन काळजी घेऊ हे मी तुम्हाला आश्वासित करतो. फक्त हे करत असताना सिंधुर्गातील जनतेचे हित हे डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करायचंय आणि तेच काम तुम्ही आणि आम्ही सर्वांनी उभं करूया असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.