Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी एसटीच्या १०० बस गाड्या जादा सोडणार! : पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना.

  • वीज आणि मोबाईल नेटवर्क सक्षम करा. स्वच्छ शौचालय व्यवस्था निर्माण करून द्या.!
  • मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून भक्तांना दर्जेदार सेवा द्या!
  • पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना.
  • संतोष राऊळ (ओरोस )
  • महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी कुणकेश्वर भक्तांना ये – जा करण्यासाठी किमान शंभर एसटी बस गाड्यांची व्यवस्था करा. कुणकेश्वर भक्तांना कोणत्याच कारणास्तव त्रास होत नाही याची काळजी घ्या. वीज वितरण व्यवस्था सक्षम मोबाईल नेटवर्क सक्षम करा.शौचालय व्यवस्था उपलब्ध करून द्या आवश्यक त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट उभे करा. प्रत्येक भक्ताचा दर्शन प्रवास सुखकर झाला पाहिजे याची काळजी घ्या. अशा स्पष्ट सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी आज श्री देव कुणकेश्वर यात्रेच्या नियोजनाच्या बैठकीत दिल्या.
    जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुणकेश्व यात्रे च्या नियोजनाची बैठक घेतली.यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक,प्रांत, व सर्वच खात्याचे प्रमुख अधिकारी त्याचप्रमाणे कुणकेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष संचालक सरपंच आदी उपस्थित होते.

  • कुणकेश्व मंदिर परिसरात भक्तांची कोणतीच गैरसोय होता नये. मंदिराकडे येणाऱ्या तिन्ही बाजूचे रस्ते सुस्थितीत ठेवा.तुमचाच आमदार पालकमंत्री आहे .त्यामुळे आपण कुठेही कमी पडणार नाही. मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासन म्हणून जनतेला सर्व सुखसोयी देऊया. प्रशासन संपूर्ण सतर्क झालेले आहे. कोणतीच अडचण भक्ताना भासणार नाही अशी व्यवस्था केली जाईल.भक्ताना दर्शनासाठी ये – जा करण्यासाठी शंभर एसटी बस सोडल्या जातील. शौचालय,मोबाईल टॉयलेट, मोबाईल नेटवर्क आणि विज वितरण व्यवस्था सुस्थितीत ठेवा भक्तांना कोणतेच गैरसोय होता नाही याची काळजी घ्या स्पष्ट सूचना सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.
    दरम्यान मंदिर प्रशासन आणि ग्रामपंचायत यांनी सुचित केलेल्या प्रश्नांवर चर्चा करताना पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागाला सूचना देत कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करा. दरवर्षीच या जत्रा येत असतात. आंगणेवाडी, कुणकेश्वर अशा मोठ्या जत्रांसाठी वीज व्यवस्था, टेलिफोन नेटवर्कची व्यवस्था, ही कायमस्वरूपीच सुसज्ज असली पाहिजे याबाबत ठोस निर्णय घेऊन कारवाई करा. पुन्हा हे प्रश्न निर्माण होता नये याची काळजी घ्या, अशा सूचना दिला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles