Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

वाढती व्यसनाधीनता ठरते महिलांच्या विकासात अडथळा ! : अर्पिता मुंबरकर.

देवगड : शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित, पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय, शिरगाव येथे महिला विकास समितीतर्फे महिला सक्षमीकरण सप्ताहानिमित्ताने ‘महिला सक्षमीकरण आणि व्यसनमुक्ती’ या विषयावर नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
समाजामध्ये वाढत जाणाऱ्या व्यसनांना वेळीच पाय बंद घातला नाही तर महिलांच्या आरोग्यावर तसेच आर्थिक, सामाजिक जीवनावर मोठा परिणाम होईल. कुटुंबातील व्यसनाधीन व्यक्तीमुळे महिलेवर उपासमारीची वेळ येते याचा परिणाम तिच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यावर होताना दिसतो आहे. व्यसनाधीन व्यक्तीच्या कृत्यामुळे व त्याच्या त्रासाला कंटाळून अनेक महिला भीतीने जीवन जगत आहे. समाजामध्ये त्यांचे ताठ मानेने वावरणे कठीण झाले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने १९७५ हे जागतिक महिला वर्ष म्हणून साजरे केले होते. त्यानंतर निरनिराळ्या महिला संघटनांच्या माध्यमातून तसेच शासन स्तरावर गेले पन्नास वर्ष महिला सक्षमीकरणाचे अनेक प्रयोग करताना आपण पहातो तरीही आजही व्यसनाधीनतेमुळे महिलांना हिंसाचाराला,अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. याचाच अर्थ व्यसनाधीनता महिला सक्षमीकरणातला मोठा अडथळा ठरत आहे. यापुढे कुटुंबाला व्यसनमुक्त ठेवायचे असेल तर मुलींनी निर्व्यसनी जोडीदार निवडणे गरजेचे आहे. तरच व्यसनमुक्त आनंददायी जीवन जगणाऱ्या कुटुंबांमध्ये महिलांचे सक्षमीकरण होईल असे मत अर्पिता मुंबरकर यांनी व्यक्त केले.

यावेळी सर्वांनी व्यसनमुक्त राहण्याचा व व्यसनमुक्त जोडीदार निवडण्याचा निर्धार केला. हा कार्यक्रम महिला विकास समिती प्रमुख प्रा. मयुरी कुंभार, प्रा. सिद्धी कदम प्रा. सुगंधा पवार, प्रा. कोमल पाटील प्रा. क्षेत्र मोडकर प्रा.सोनाली ताम्हणकर प्रा. आशय सावंत या सर्वांच्या सहभागाने यशस्वी झाला.

ADVT –

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles