Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत वेंगुर्ल्याच्या कन्येने मारली बाजी.!, किरण मेस्त्री यांना बेस्ट रॅंप वाॅक अवॉर्ड.! ; महानगरांची सौंदर्य स्पर्धेतील मक्तेदारीला दिला शह, आता कोंकणही होतंय ग्लोबल.!

कोकण कन्या आता आत्मनिर्भर!

वेंगुर्ला : नुकत्याच झालेल्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत वेंगुर्ल्याच्या कन्येने बाजी मारल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय.

वेंगुर्ला येथील कु. किरण मेस्त्री यांना बेस्ट रॅंप वाॅक अवॉर्ड मिळाला आहे. म्हणून आज वेंगुर्ला भाजपा महिला मोर्चाच्या वतीने कु. किरण मेस्त्रीचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी कु. किरण हिचे अभिनंदन आणि कौतुक करतांना कोंकणातील मुलींसमोर कु. किरणने आदर्श घालून दिला आहे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सौ. सुषमा प्रभूखानोलकर यांनी केले. या प्रसंगी बोलताना भाजपा वेंगुर्ला तालुका महिला मोर्चा अध्यक्ष सौ. सुजाता पडवळ म्हणाल्या, अलीकडे कोंकणातील मुली आणि महिला कित्येक क्षेत्रात बाजी मारत आहेत. आता अशा होतकरू मुली आणि महिलांच्या पाठी आपण समर्थपणे उभे राहिले पाहिजे, त्यांना तांत्रिक व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. यावेळी उपस्थित महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ. वृंदा गवंडळकर यांनी भाजप पक्ष खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण करत आहे, असे सांगितले.
या छोटेखानी अभिनंदनपर कार्यक्रमाला सरचिटणीस सौ. आकांक्षा परब, महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. श्रेया मयेकर, माजी पंचायत समिती सभापती सौ. स्मिता दामले, सदस्य वृंदा मोर्डेकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, आगामी काळात किरणला जे जे सहकार्य आणि मार्गदर्शन लागेल ते भाजपा महिला आघाडीच्या वतीने करणार असल्याची ग्वाही सुजाता पडवळ यांनी दिली.

 

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles