स्वातंत्र्यवीर सावरकर समजून घ्यायचे असतील तर त्यांचे साहित्य वाचावे : ॲड. नकुल पार्सेकर. ; नेमळे विद्यालयात स्वा. वि. दा. सावरकर स्मृतिदिन साजरा.!

सावंतवाडी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या विचारांचे जागर करणारी एक आदर्श संस्था म्हणजे नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्था आहे. तसेच स्वा. वि. दा. सावरकर समजून घ्यायचे असेल तर त्यांचे साहित्य विद्यार्थ्यांनी आवश्यक वाचावे. असा मौलिक सल्ला अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर यांनी दिला. सावंतवाडी तालुक्यातील नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे व श्रीदेवी सातेरी ग्रंथालय व सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ नेमळे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वा. वि. दा. सावरकर स्मृतिदिनानिमित्त घेतलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ॲड. नकुल पार्सेकर बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. भि. राऊळ यांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

स्पर्धेत सहा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात प्रथम-कुमारी-साक्षी मोहन दळवी (नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळे), द्वितीय-कुमारी-अमृता दत्ताराम नवार (न्यु इंग्लिश स्कूल, उभादांडा), तृतीय क्रमांक कुमारी-कोमल अजित परब (श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव), तसेच चतुर्थ क्रमांक कुमारी-सायली संदिप आळवे (नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळे) हिने प्राप्त केला.

 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्या के. व्ही. बोवलेकर यांनी केले. या कार्यक्रमाला सचिव स. पा. आळवे, लवू मांजरेकर, एम. पी. सारंग, लवू जाधव, नितीन धामापूरकर, उमेश राऊळ, नेत्रा चव्हाण, अश्विनी तामाणेकर, कीर्ती मयेकर, शीतल बरागडे, नेहा कोंडये आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून राजेश गुडेकर व पांडुरंग दळवी यांनी काम पाहिले. तसेच टाईम किपर म्हणून सी. टी. बंगाळ यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले. आभार आर. के. राठोड यांनी मानले.

ADVT –

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles