सावंतवाडी : तालुक्यातील बांदा देऊळवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे सक्रीय सदस्य तुकाराम महादेव मोरजकर (वय ७८) यांचे आज बुधवारी सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. बुधवारी दुपारी बांदा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक सकाळचे बांदा प्रतिनिधी निलेश मोरजकर यांचे ते वडील तर शिक्षिका रिना मोरजकर यांचे ते सासरे होत.



