‘बाल स्नेही पुरस्कार – २०२४’ – उत्कृष्ट बाल कल्याण समिती पुरस्काराने सिंधुदुर्ग, कोकण विभागाचा विशेष सन्मान.!

मुंबई : दिनांक 3 मार्च 2025 राेजी ॲड. प्रा. अरुण पणदूरकर हे Bench of Magistrate असलेल्या तसेच ॲड. संदेश तायशेटे, श्रीमती नम्रता नेवगी, प्रा. माया रहाटे, प्रा. अमर निर्मळे हे सदस्य असलेल्या बाल कल्याण समिती सिंधुदुर्गला ‘बाल स्नेही पुरस्कार – २०२४’ – ‘उत्कृष्ट बाल कल्याण समिती’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बाल कल्याणाच्या कार्यात CWC – Child Welfare Committee च्या माध्यमातून केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल ॲड. सुशीबेन शाह, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या हस्ते व आदिती तटकरे (मंत्री महिला व बाल विकास विभाग) तसेच श्रीमती मेघना बोडीकर (राज्य मंत्री महिला व बाल विकास विभाग) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा खास कार्यक्रम, यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई येथे संपन्न झाला. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांनी आयोजित केलेला होता.

मुलांच्या संरक्षण व काळजी संबंधित उत्कृष्ट कार्य करण्यासंबंधी हा पुरस्कार असल्याने ‘बाल स्नेही 2024 – उत्कृष्ट बाल कल्याण समिती’ हा विशेष सत्कार मानाचा समजला जातो.

या विशेष पुरस्काराबद्दल ॲड.. प्रा. अरुण पणदूरकर यांनी पुरस्कार निवड समिती व महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांचे आभार मानले आहेत व आपले मुलांच्या संरक्षण व काळजी संबधी Bench of Magistrate च्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचा घेतलेला वसा असाचा पुढे चालू ठेवण्याचे अभिवचन दिलेले आहे.

ADVT –

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles