सावंतवाडी : कुडाळ – मालवण मतदार संघाचे डॅशिंग आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस उद्या दुपारनंतर साडेतीन वाजता हॉटेल मॅंगो येथे वाढदिवस साजरा होणार आहे. यावेळी निलेश राणे यांचा वाढदिवसानिमित्त केक कापून आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हा संघटक सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी दिली.

तरी या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी निलेश राणे यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम मित्र परिवार, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाऊंडेशनच्या कार्यकर्ते व पदाधिकारी मंडळी यांनी उपस्थित राहावे, असेही संजू परब यांनी कळविले आहे.
ADVT –




