Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

पालकमंत्री नितेश राणे यांचा ‘ऑन द स्पॉट’ फैसला. ; ओरोस येथे पालकमंत्र्यांना भेटीसाठी जनसागर लोटला. 

. प्रत्येकाचे समाधान होईल अशा पद्धतीने पालकमंत्र्यांनी साधला जनतेशी संवाद.
.तक्रारदाराचा प्रश्न समजावून घेत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना, केले तक्रारीचे निरसन.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्गनगरी येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या गाठीभेटीसाठी जनसागर लोटला. अखेर या गाठीभेटी जागा कमी पडू लागल्यामुळे जिल्हा नियोजन सभागृहात घ्याव्या लागल्या. साडेसात वाजेपर्यंत या गाठीभेटी सुरू होत्या.प्रत्येकाच्या समस्या जाणून घेत जनतेच्या प्रश्नांची “ऑन द स्पॉट ” सोडवणूक केली. अनेक तक्रारदारांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना थेट सूचना देत प्रश्न निकाली काढले. काही अधिकाऱ्यांना तर फोन वरुनच थेट सूचना दिल्या अशा पद्धतीने प्रत्येकाचे समाधान होईल अशा पद्धतीचे आज पालकमंत्री नितेश राणे यांनी कामकाज पूर्णत्वास नेले. एकूणच गाठी भेटीनंतर अनेकांनी समाधान व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आपल्या शासकीय कार्यालयात मंत्रि नितेश राणे यांनी जनतेच्या गाठीभेटी घेऊन त्यांची निवेदन स्वीकारून समस्या ऐकून घेतल्या. काही समस्या त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना देऊन सोडवल्या तर काही समस्या या अधिकाऱ्यांना मुदत देऊन सोडवण्याचे आदेश दिले. एकूणच गाठीभेटींचे स्वरूप व्यक्तिषा जरी असले तरी प्रशासनाला सहभागी करून घेत अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याची पालन करावे अशा पद्धतीची सूचना दिली. काही समस्या या शासन निर्णयाप्रत होत्या तर काही समस्या या संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांच्या निर्णय क्षमतेमुळे अडकलेल्या होत्या. या सर्व समस्यांना न्याय देण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले.

सिंधुदुर्गनगरी येथील पालकमंत्री कशात ना. नितेश राणे यांनी जनतेच्या गाठी भेटी घेत जनतेची गाऱ्हाणी ऐकली. या वेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदींसह पदाधिकारी व जनता मोठ्या प्रमाणावर होती. सुमारे चार तास चाललेल्या या गाठी भेटीमध्ये सुमारे एक हजारवर निवेदने सादर झाली. जिल्ह्यातील काना कोपऱ्यातून जनता आली होती. तर रत्नागिरी जिल्ह्यातूनही लोक पालकमंत्री नितेश राणे यांच्या भेटीला उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles