कणकवली : कोकणचे भाग्यविधाते खासदार श्री. नारायण राणे यांच्या दूरदृष्टीतून आणि पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्गच्या माध्यमातून वाघेरी येथे मार्केट यार्डची उभारणी होत आहे. या प्रकल्पाबद्दल खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे वाघेरी माजी सरपंच, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक, आदर्श शेतकरी जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय सरपंच परिषद आणि जिल्हाध्यक्ष सरपंच संसद श्री. संतोष राणे यांनी आभार व्यक्त केले आहेत. तसेच या प्रकल्पामुळे वाघेरी गाव परिसराचा कायापालट होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तब्बल चार हेक्टर परिसरात आणि 70 कोटी रुपये खर्च होऊन उभारल्या जाणाऱ्या मार्केट यार्ड मुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीमालाला प्रत्येक वेळी विक्रीसाठी दूरच्या बाजारपेठेवर अवलंबून राहावं लागत होते परंतु आता वाघेरी येथे होणाऱ्या मार्केट यार्ड मुळे शेती भावाला जवळची बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच जवळच नांदगाव रेल्वे स्टेशन असल्यामुळे आपला शेतीमाल अगदी कमी वेळेत राज्याच्या नव्हे तर देशाच्या काना-कोपऱ्यामध्ये सहजरीत्या पोहोचवता येईल. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला बळकटी येणार आहे. या हक्काच्या मार्केट यार्ड मुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांपर्यंत न जाता राज्यातील व्यापाऱ्यांना आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत मार्केट यार्ड मध्ये यावं लागेल.. आपल्या जिल्ह्यातील उत्पादनांना अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणि स्थानिक व्यापाऱ्यांसाठी हे एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले असून, वाघेरी येथे नवीन मार्केट यार्ड उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने विशेष पुढाकार घेतल्यामुळे जिल्हावासियांची अनेक वर्षांच्या मागणीची पूर्तता होत आहे.
शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडवणाऱ्या या निर्णयाबद्दल जिल्ह्यातील सर्व शेतकरी व नागरिक यांनी आभार व्यक्त केलें आहेत .गावातील या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवरील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असा विश्वास संतोष राणे यांनी व्यक्त केला आहे.
गावातील प्रत्येक नागरिक आणि शेतकरी योजनेशी जोडले गेले असून, मार्केट यार्ड उभारण्यामुळे गाव परिसर विकासाला नवी दिशा मिळेल, तसेच या सुविधांमुळे गावचा चेहरा मोहरा बदलेल.. यार्ड उभारणीचे काम लवकर पूर्ण होईल यासाठी वाघेरी गावचे संपूर्ण सहकार्य राहील याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
ADVT –




