अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

सावंतवाडी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्यावतीने सोमवारी १४ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सावंतवाडी भटवाडी येथे सकाळी १० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, सकाळी १०:३० वाजता समाज मंदिर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर भटवाडीत सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवादी, विनायक गुरव आदी उपस्थित मान्यवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी विविध कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर जाधव यानी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles