Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

तिथल्या जमिनी विकू नका ! ; मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांना भावनिक साद.!

अमरावती : विदर्भातील अमरावती येथे विमानतळाचे लोकार्पण केल्यानंत विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी, भाषण करताना फडणवीसांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना भावनिक साद घातली. शेतकऱ्यांनी जमीन विकली नाही पाहिजे, दलालांच्या भानगडीत पडलं नाही पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. शेतकरी असो की प्रकल्पग्रस्त असो, आता कायदा असा केला आहे की, कोणतंही सरकार आलं तरी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल. कोणीतरी येतो आणि शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतो आणि पाचपट दराने तो विकतो. त्यामुळे, शेतकर्‍यांनी जमीन विकू नये, पूर्ण माहिती घ्या कोणालाही बळी पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमरावती येथील कार्यक्रमातून शेतकऱ्यांना केलं आहे.

आम्ही जमिन अधिग्रहणाची घोषणा केली की कोणीतरी धन्नाशेठ येतो आणि शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतो. त्यानंतर, 5 पटीने तेथे पैसे कमावतो. त्यामुळे, ज्याठिकाणी जमीन अधिग्रहण होतोय, त्याठिकाणी तुम्ही जमिनी विकू नका, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसेच, कोणीतरी अचानक तुमची जमीन विकत घेतोय तर माहित घ्या हा जमीन का घेतोय. कारण, शेतकऱ्यांना पैसे मिळावे, व्यापाऱ्यांना नको, अशी आमची भावना आहे, असे म्हणत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देवेंद फडणवीसांनी महत्त्वाचं आवाहन केलंय. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना येत्या काळात सगळ्यांना पैसे मिळतील, कोणीही आलं तर तुम्ही थेट कार्यालयात जा, पण दलालांच्या भानगडीत पडू नका, असा सल्ला देखील फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिला. तसेच, समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांसाठी लाईफलाईन बनल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस सरकारवर टीका –

विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची संधी मला तुमच्या अरशीर्वादाने मिळाली. सन 2006 ते 2013 च्या काळात येथील शेतकऱ्यांची फसवणूक झाली. सर्व प्रकारचे हक्क गोठवण्याचे काम झाले, कोणाला एक लाखाचा भाव देऊन हक्क गोठवण्याचे काम झाले. मग मी मुख्यमंत्री झालो तेव्हा नवीन जीआर काढला आणि थेट खरेदी सुरू केली. मग अनेकांना कळलं की आमची फसवणूक झाली आहे. सुरुवातीच्या काळात अनेक बैठका झाल्या, त्या लोकांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. मग, युतीचं सरकार आलं तेव्हा अनेक आंदोलनंही झाले, काही आत्महत्याही झाल्याचा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला.

CM Devendra Fadnavis emotional appeal to farmers in amravati and said Dhannaseth Dont sell the farm land there acquisition Devendra Fadnavis तिथल्या जमिनी विकू नका, मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांना भावनिक साद, म्हणाले कोणीतरी धन्नाशेठ...

आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन बसलो –

2022 ला महायुतीचं सरकार आलं तेव्हा मी बैठक घेतली आणि या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आमदार प्रताप अडसड मला नेहमी भेटायचे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा म्हणत मागणी करायचे. कायद्याने आम्हाला मार्ग काढायचा होता. मग आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन बसलो आणि म्हटलं की आपण सानुग्रह अनुदान दिले तर काय होईल. त्यामुळे अखेर निर्णय घेतला आणि जर यात काही अडचण आली तर मी त्याला उत्तर देईल, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आपण न्याय मिळवून दिल्याचे म्हटले.

दरम्यान, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी अखेर निर्णय झाला आणि आज वाटपाची सुरुवात होत आहे. नेहमी विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय का होतो. अन्याय होत असेल तर कायदा बदलून न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. येथील प्रकल्पग्रस्त मुलांना आता कर्ज कसं देता येईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles