सावंतवाडी : माजी आमदार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेला सेवा सप्ताहात कोंडुरा येथील माऊली मूकबधिर व कर्णबधिर विद्यालयात प्रतिवर्षीप्रमाणे जी. जी. उपरकर यांचा वाढदिवस मुलांसोबत साजरा करण्यात आला. यात स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करून श्री. उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांकडून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्याचप्रमाणे मुलांनी देखील श्री. उपरकर यांना स्वतःच्या कलेतून ग्रीटिंग कार्ड रंगवून वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. मागील अनेक वर्षे श्री. उपरकर यांचा वाढदिवस येथील आश्रमात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करून सामाजिक उपक्रमानी हा वाढदिवस साजरा करण्यात येतो. यावेळी आशिष सुभेदार,
मंदार नाईक, आबा चीपकर, स्वप्नील जाधव, प्रवीण आरोसकर, सुनील नाईक, नंदू परब, गौतम सावंत, सूरज साळगावकर आदी उपस्थित होते.
ADVT –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!