Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

लोकशाही राष्ट्रांमध्ये राजाऺची जय॑ती होणे ही त्या राजाचे महानपण ! : धम्मचारी डॉ. प्रज्ञाच‌क्षू ; भिमगर्जना युवक मंडळ, इन्सुली आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन.

सावंतवाडी : जगाच्या जडणघडणीत असे अनेक राजे इतिहासात होऊन गेले परंतु प्रियदर्शनी सम्राट अशोक यांसारखे राजे लोकांच्या हृदयात आजही देवासारखे बसले आहेत ते त्यांच्या लोकांसाठी असलेल्या करूणेसाठी व त्यांच्याप्रती असलेल्या कर्तृत्वासाठी आणि म्हणून जगज्जेत्या सिकंदरापेक्षाही शस्त्राने नव्हे तर आपल्या प्रिय वाणीने चाळीस वर्षाची यशस्वी राजकिर्द घडविणारे चक्रवर्ती सम्राट अशोक हे एक महान राजा असल्याचे प्रतिपादन धम्मचारी डॉ. प्रज्ञाचक्षू यांनी आपल्या व्याख्यानात बोलताना केले.
भिमगर्जना युवक मंडळ इन्सुली, रमाईनगर येथील प.पू.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिरात झालेल्या चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानात बोलताना पुढे ते म्हणाले सम्राट अशोकाने केवळ माणसांसाठीच नव्हे तर मूक पशू-प्राण्यांसाठी दवाखाने, पर्यावरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली, तसेच शिक्षण व संशोधनासाठी नालंदा, तक्षशिला,उज्जैन यासारखी विश्वविद्यापिठे निर्माण करून बौद्ध धम्माचा शांती करूणेचा मार्ग जगाला दाखविला आणि आपल्या महेंद्र व संघमित्रा या दोन्ही मुलांना बौद्ध धम्माच्या प्रचार – प्रसारासाठी श्रिलंकेला पाठवून पालकनीतीचा आदर्श लोकांपुढे ठेवला. तसेच बौद्ध धर्माला राजाश्रय असुनही आजच्या राज्यकर्त्यांसारखे कोणत्या तरी एका धर्माला राष्ट्रधर्म न मानता सहिष्णूता तत्त्वाचे पालन करत इतर धर्मांना त्यांचे स्वातंत्र्य दिले; म्हणून रयतेचे राज्य निर्माण करणारे सम्राट अशोक यांची जयंती लोकशाही प्रधान असलेल्या राष्ट्रांमध्ये होणे ही त्यांचे महानपण असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात डॉ.प्रज्ञाचक्षू तसेच भिमगर्जना युवक मंडळांचे अध्यक्ष परेश जाधव, सचिव अरविंद जाधव यांच्या उपस्थितीत सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ‌व दीप प्रज्वलनाने झाली.परेश जाधव यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले;तर सिध्देश जाधव यांनी आभार व्यक्त करताना ज्या सम्राट अशोकाची राजमुद्रा व अशोक चक्र भारतीय राष्ट्रीय चिन्ह आहेत त्यांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होणे गरजेचे असल्याचे सांगितले.या कार्यक्रमासाठी कृष्णा जाधव, सदानंद जाधव, आनंद जाधव, दिपेश जाधव,तेजस जाधव,अम्रित जाधव, तन्मय जाधव, संजना जाधव,सविता जाधव, दिपाली जाधव, वृषाली जाधव, स्मिता जाधव,मिनल जाधव,दिव्या जाधव,स्वप्नाली जाधव,स्म्रितिषा जाधव,सानिका जाधव, ललिता जाधव, मनिषा जाधव,जयश्री जाधव, सृष्टी जाधव,दिक्षा जाधव आदी तसेच इन्सुली रमाईनगर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

खुशखबर ..! – आंबोलीत ‘साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबीर’. ; The Colonel’s Academy for Adventure & Aero sports आणि सैनिक स्कूल आंबोलीचे संयुक्त आयोजन. ..

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles