सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि.एल. भारमल आय क्यू ए सी समन्वयक डॉ. बी.एन. हिरामणी, प्रोफेसर यु. एल. देठे, डॉ. यू सी पाटील, डॉ .डी जी बोर्डे डॉ.जी एस मर्गज, डॉ. डी बी शिंदे, डॉ. एस.ए. देशमुख ,डॉ. यु आर पवार ,प्रा.
एम.व्हि.आठवले, श्री लांबर आदी उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रा बद्दल माहिती दिली आणि त्यांचे कार्य येणाऱ्या सर्व पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या आदर्श सर्वांनी घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील ग्रंथांचे प्रदर्शन ग्रंथालय हॉलमध्ये करण्यात आले.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


