Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

अभिमानास्पद – सिंधुकन्या कवयित्री स्नेहा विठ्ठल कदमचा क्रांतिभूमी महाड येथे सन्मान. ; दिग्गजांची लाभली उपस्थिती.

सावंतवाडी : अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने, साहित्य क्षेत्रात दमदार कामगिरी करत, विविध साहित्यिक पुरस्कार मिळविणार्‍या साहित्यिक, कवी मित्रांचा नुकताच महाड चवदार तळे क्रांती भूमीवर भारततरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला. या सत्कार सोहळ्यात सिंधुदुर्गातील आजची आघाडीची कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम हिल्या पहिल्या काव्यसंग्रहाला (शिल्लक भितीच्या गर्भकोशातून) ‘कविवर्य नामदेव ढसाळ’ व ‘कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल व  स्नेहा कदम ही फुले, शाहू, आंबेडेकर चळवळीतील युवा कायकर्ता म्हणून पद्मश्री सुधारक ओलवे, पॅन्थरचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक ज.वी.पवार,अपरांतचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर, महासचिव कविवर्य सुनील हेतकर, साहित्यिक संदेश पवार, डॉ. संजय खैर, पत्रकार दीपक पवार यांच्या उपास्थितीत स्नेहाला गौरविण्यात आले.

यावेळी दलित साहित्याचे सखोल अभ्यासक ज.वी. पवार, साहित्यिकप्रा. आनंद देवडेकर यांनी स्नेहाच्या कवितेबद्दल गौरोद्‌गार काढले. परिवर्तनवादी साहित्याला एक प्रखर विद्रोही नवा चेहरा मिळाला, असून स्नेहाची कविता साहित्य अकादमी पुरस्कार मिळवण्याच्या उंचीची असल्याचे विशद केले. यावेळी सिंधुदुर्गातीलन कविवर्य प्राचार्य सिद्धार्थ तांबे, प्रसंवादचे संपादक अनिल जाधव यांचाही गौरव क्रांतीभूमीवर करण्यात आला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles