अभिनंदनीय – राज्य अभियंता संघटनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सागर मांगले यांची निवड.

रत्नागिरी :  राज्य अभियंता संघटनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी देवरूखमधील सागर मांगले यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. लोणावळा येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या महाअधिवेशनामध्ये राज्याध्यक्ष मिलिंद भोसले यांच्याहस्ते सागर मांगले यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. राज्य अभियंता संघट‌नेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सागर मांगले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले, महासचिव प्रशांत कारंडे, सचिव राजेश देशमुख यांच्यासमवेत संपूर्ण ३५ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. सागर मांगले यांच्या निवडीनंतर त्यांचे जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles