सिंधुदुर्ग : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बेघर व्यक्तींना स्वत:च्या मालकीचे घर उपलबध होऊन त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा, त्यांचे राहणीमान उंचवावे या हेतूने ग्रामीण व शहरी भागातील स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घराठच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत रमाई आवास योजना ग्रामीण व शहरी भागात राबविण्यात येत असल्याची माहिती सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी दिली आहे.
सन 2025-26 ची उद्दिष्टे मंजूर करण्यासाठी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे ग्रामपंचायतीमार्फत व शहरी भागातील लाभार्थ्यांचे नगरपंचायत/नगरपरिदेमार्फत प्राप्त प्रस्तावानुसार उद्दिष्टांचीसंख्या त्वरीत कळविण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण संतोष चिकणे यांनी केले आहे.
ADVT –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!


