वेंगुर्ला : भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं आज (6 मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री 1:28 वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन 1:51 वाजता ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.
आज दिनांक 7 मे 2025 रोजी भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुका कार्यालय येथे वेंगुर्ला तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित श्री विष्णू उर्फ पपू परब(तालुकाध्यक्ष), श्री प्रसन्ना देसाई (जिल्हा उपाध्यक्ष),श्री सुहास गवंडळकर (माजी तालुकाध्यक्ष) ,श्री साई प्रसाद नाईक, श्री राजन गिरप(जिल्हा निमंत्रीत), श्री वसंत तांडेल(जिल्हा का का सदस्य), श्री मनवेल फर्नांडीस (जिल्हा का का सदस्य), सौ वृंदा गवंडळकर(जिल्हा उपाध्यक्ष), श्री हेमंत गावडे (युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष), श्री प्रणव वायंगणकर (युवा मोर्चा तालुका अध्यक्ष), श्री मनोहर तांडेल(युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष), श्री प्रीतम सावंत (युवा मोर्चा), श्री वैभव होडावडेकर (युवा मोर्चा सरचिटणीस), सौ हसीनबेगम मकानदार (अल्प संख्यांक मोर्चा), श्री अनंत केळूसकर , श्री सायमन आल्मेडा (अल्पसंख्यांक मोर्चा), श्री अनंत उर्फ दादा केळुसकर (मच्छीमार नेते), सौ शितल आंगचेकर (माजी उपनगराध्यक्ष), श्री सुभाष खानोलकर (सरपंच खानोली) ,श्री सुनील घाग (ग्रामपंचायत सदस्य), सौ कार्तिकी पवार, सौ स्वरा देसाई (ग्राम. सदस्य), श्री गणेश गावडे (शक्ती केंद्र प्रमुख), श्री पुंडलिक हळदणकर(बूथ प्रमुख), श्री कृष्णा हळदणकर,श्री सत्यवान पालव (बूथ अध्यक्ष), श्री राहुल मोर्डेकर (बूथ अध्यक्ष), श्री तेजस कुंभार (बूथ अध्यक्ष), श्री रवींद्र शिरसाट (बूथ प्रमुख), श्री नामदेव सरमळकर (बूथ अध्यक्ष), श्री सत्यविजय गावडे (सरपंच अणसूर), श्री राजबा सावंत ( उपसरपंच होडावडा), श्री कृष्णाजी सावंत (ग्राम. सदस्य), श्री अजित कनियाळकर, श्री आदित्य मांजरेकर, श्री रफीक शेख, श्री नितीन लिंगोजी,श्री अक्षय परब, श्री महेश प्रभुखानोलकर ,श्री रामचंद्र गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
ऑपरेशन ‘सिंदूर’ सक्सेस, वेंगुर्लेत भाजपाचा जोरदार जल्लोष !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


