सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथील श्री देव वेतोबा वर्धापन दिन रविवार, दिनांक १८ मे रोजी भक्ती भावाने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात सकाळी ६.२५ वाजता अभिषेक, लघुरुद्र व आरती, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, रात्री ८ वाजता पालखी.
तसेच रात्री ठीक ८.३० वाजता ‘मानी मराठा’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले.
तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकर मंडळी व आजगाव ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले आहे.
ADVT –


