डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा २५ मे ला पुणे येथे होणार ! ; राज्य कार्यकारिणी पुण्यातील बैठकीत निर्णय : राजा माने.

  • महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे वितरण व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे होणार उद्घाटन.

पुणे : तोंडावर असलेल्या पावसाळ्याच्या व देशातील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सावंतवाडी येथे होणारे तिसरे महाअधिवेशन स्थगित केल्या नंतर राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा महामेळावा येत्या २५ मे २०२५ (रविवार) रोजी आयोजित करण्याचा आज येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजा माने हे होते.राज्य सचिव महेश कुगावकर, सह सचिव केतन महामुनी,राज्य संघटक शामल खैरनार,राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक नलावडे,अमोल पाटील हे उपस्थित होते. सतीश सावंत, विकास भोसले, इक्बाल शेख,तेजस राऊत,मुरलीधर चव्हाण तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश हुंबे, अजिंक्य स्वामी, संजय भैरे,प्रशांत कटारे, राजाराम मस्के आदी या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले. महामेळाव्यात महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे वितरण तसेच पत्रकारांच्या मुला-मुलींच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचे उद्घाटन करण्याचा निर्णय झाला. पुणे येथील कार्यक्रम स्थळ व प्रमुख पाहुण्यांची नावे येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहेत.

ADVT –

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles