सावंतवाडी : मान्सून पूर्व पावसाच्या तडाख्याने गेले चार दिवस न्हावेली गावातीलविद्युतपुरवठा ठप्प होता, यामुळे गावातील नागरीकांची मोठी गैरसोय होत होती, यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा न्हावेली उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या सावंतवाडी कार्यालयात जाऊन सावंतवाडी ग्रामीण भागातील सहाय्यक अभियंता श्री.खांडेकर यांना जाब विचारत चांगले धारेवर धरले.
यावेळी महावितरण कर्मचाऱ्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला जात नसल्याचे श्री.पार्सेकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. शिवाय गावात वारंवार वीजेचा पुरवठा खंडीत होत असल्याबाबत संताप व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीत आज गावातील वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास वीज कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री.खांडेकर यांनी स्वतः कर्मचाऱ्यांना घेऊन गावात येऊन वीजपुरवठा सुरळीत करुन देतो असे आश्वासन दिले.
त्यानंतर लागलीचं महावितरणची टिम न्हावेली गावात दाखल झाली असून वीज दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा न्हावेली उपसरपंच श्री.अक्षय पार्सेकर यांच्यासह ग्रामस्थ राज धवण, दिपक पार्सेकर, नवनाथ पार्सेकर, विठ्ठल परब, प्रथमेश नाईक, पञकार निलेश परब उपस्थित होते.


