Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

गुंगीचं ड्रिंक पाजून भावी डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार, तिघांना अटक ! ; महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना.

सांगली : सांगली शहरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या भावी डॉक्टर तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक अत्याचार केला. वानलेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या खोलीत ही घटना घडली.
याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीसांनी तातडीने हालचाली करत तीन तरुणांना अटक केली आहे.
यातील दोघे पिडित तरुणीच्या कॉलेजमध्येच शिकत असून, तिसरा संशयित तरुण त्यांचा मित्र आहे.
चित्रपट पाहायला जाण्याचा केला बहाना
विनय विश्वेष पाटील (वय २२, रा. महीपती निवास अंतरोळीकर नगर भाग १ सोलापुर शहर), सर्वज्ञ संतोष गायकवाड (वय२०, रा. एफ ६०५, सरगम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे), तन्मय सुकुमार पेडणेकर (वय २१, रा. ३०३ कासाली व्हिया अभयनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पिडित तरुणी आणि संशयित पाटील,गायकवाड सांगलीतील एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहेत.पिडित तरुणी तिसऱ्या वर्षात शिकत आहेत.
रात्री या तिघांनी तिला चित्रपट पाहायला जाऊ असे सांगून मोपेडवरून वानलेसवाडी येथील खोलीवर नेले.
गुंगीकारक ड्रिंक पाजले. रुमवर गेल्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजले तसेच तेही दारू प्यायले.त्यानंतर तरुणी नशेत असताना तिघांनी तिच्यावर अत्याचार केले.काही वेळाने तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिने तेथून स्वतःची सुटका करून घेतली त्यानंतर मध्यरात्री थेट विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले.त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची तक्रार ऐकून गुन्हा नोंद करून तातडीने संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या.
संशयितांना अटक
विश्रामबाग पोलीसांनी अवघ्या काही तासात तीनही संशयितांना अटक केली.विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबा नरळे,प्रशांत माळी,आर्यन देशिंगकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलीसांकडून या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles