Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

तुळस येथील रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!, महिला रक्तदात्यांचे विशेष योगदान ! ; वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, वेंगुर्ला तालुका पत्रकार समिती व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांचे संयुक्त आयोजन.

  • संजय पिळणकर.

    वेंगुर्ला : ‘रक्तदान हे श्रेष्ठ दान!, या सामाजिक मंत्राला अनुसरून तुळस येथे पार पडलेले रक्तदान शिबीर अतिशय यशस्वी ठरले. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या वतीने आणि वेंगुर्ला तालुका पत्रकार समिती व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
    शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, पत्रकार समितीचे अध्यक्ष दीपेश परब, शिवसेना तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, तुळस उपसरपंच सचिन नाईक, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, सामाजिक कार्यकर्ते नीलेश नागवेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप सावंत, पत्रकार योगेश तांडेल, दाजी तांडेल, महेंद्र मातोंडकर, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, सिंधु रक्तमित्रचे तालुकाध्यक्ष आबा चिपकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.


  • शिबिरात एकूण ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिला रक्तदात्यांची संख्या विशेष उल्लेखनीय ठरली. महिला वर्गातून रक्तदानासाठी मिळालेला प्रतिसाद समाजाच्या सकारात्मक मानसिकतेचे द्योतक असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.
    रक्तदानाद्वारे कोणाच्यातरी जीवाला नवे आयुष्य मिळू शकते, याची जाणीव ठेऊन अनेक युवकांनी अशा उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन प्रकाश तेंडोलकर यांनी केले.
    वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या कार्याचा आढावा घेत प्रतिष्ठानचे उपक्रम समाजोपयोगी असतात. त्यांना पत्रकार यांचे कायम सहकार्य लाभले, असे मत पत्रकार समिती अध्यक्ष दीपेश परब यांनी व्यक्त केले. पत्रकार प्रदीप सावंत, महेंद्र मातोंडकर यांनी या उपक्रमाचे महत्व अधोरेखित करत शुभेच्छा दिल्या.
  • कार्यक्रमाचे उद्घाटक जयप्रकाश चमणकर यांनी असे उपक्रम सातत्याने सुरू ठेवल्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले.
    विशेष म्हणजे सर्पमित्र महेश राऊळ यांनी अवयव दानाचा संकल्प केला तर जयप्रकाश चमणकर यांनी नेत्रदान संकल्प करून तसे फॉर्म प्रकाश तेंडोलकर यांच्याकडे सुपूर्द केले. रक्तदात्यांना संस्था व आयोजकांकडून प्रमाणपत्र आणि रोप देऊन गौरविण्यात आले.
    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महेश राऊळ, माधव तुळसकर, नाना राऊळ, रोहन राऊळ, यशवंत राऊळ, प्रदीप परुळकर, भक्ती भणगे, प्रसाद भणगे, प्रज्वल परुळकर, वैष्णवी परुळकर, रोहित गडेकर, भूमी परुळकर, विधी नाईक, हेमलता राऊळ, सद्गुरू सावंत, प्रमोद तांबोसकर, नाना सावळ, राजेश पेडणेकर, श्रीकृष्ण कोंडसकर, भूषण मांजरेकर, प्रसाद नाईक, सदन वराडकर यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन वेताळ प्रतिष्ठानचे सचिव प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles