भारतीय नारी सबपे भारी! – वुमन्स टीम इंडियाची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी! ; पाकिस्तानचा उडविला ६४ धावांनी धुव्वा.

बर्मिंगहम : वुमन्स टीम इंडियाने आयसीसी टी20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडिया स्पर्धेतील सहाव्या सामन्यात 14 जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत 2 गुणांची कमाई केली आहे. टीम इंडियाने बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 17 षटकांमध्ये 106 धावांवर गुंडाळलं. भारताने यासह पाकिस्तानवर 64 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. टीम इंडियाचा वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील पाकिस्तान विरुद्धचा सातवा विजय ठरला आहे. तसेच टीम इंडियाने एजबेस्टन स्टेडियममध्ये पाकिस्तानला टी 20i क्रिकेटमध्ये पराभूत करण्याची ही चौथी वेळ ठरली.

पाकिस्तानचं पॅकअप –

पाकिस्तानसाठी विजयी धावांचा पाठलाग करताना एकही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानसाठी ओपनर मुनीबा अली हीने सर्वाधिक धावा केल्या. मात्र दीप्ती शर्मा हीच्या अचूक थ्रोमुळे मुनीबाच्या खेळीचा शेवट झाला. दीप्ती मुनीबाला रन आऊट केलं. मुनीबाने पाकिस्तानसाठी सर्वाधिक 41 धावा केल्या. मुनीबा व्यतिरिक्त टीम इंडियासमोर एकाही फलंदाजाला 20 हा आकडा गाठता आला नाही. आलिया रियाझ हीने 18 धावा केल्या. तर गुल फिरोझा आणि आयेशा झफर या दोघींनी प्रत्येकी 12-12 धावा केल्या. त्याशिवाय भारतीय गोलंदाजांसमोर एकीलाही दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles