ॲड. निरवडेकरांची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत! ; युवा नेते विशाल परब., “विश्वास आणि जनसेवेच्या नात्याचा उत्सव!” ; उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा वाढदिवस भाजपा जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरा.

सावंतवाडी : “ॲड. निरवडेकरांची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत, समाजसेवेचा त्यांचा प्रवास अधिकाधिक यशस्वी होवो!” अशा शब्दांत युवा नेते विशाल परब यांनी आपल्या दिलदार मित्राला वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा दिल्या.

राजकारणाच्या पलीकडे जाऊन जिव्हाळ्याची नाती जपणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असलेले सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर यांचा वाढदिवस आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत हा सोहळा स्नेह, आपुलकी आणि शुभेच्छांचा अविस्मरणीय उत्सव ठरला.

महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्या हस्ते केक कापून, पुष्पगुच्छ प्रदान करून तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा भेट देत ॲड. निरवडेकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा, लोकाभिमुख कार्यपद्धतीचा आणि जनतेशी असलेल्या आत्मीय नात्याचा गौरव केला.

वाढदिवसाच्या निमित्ताने बोलताना अनेकांनी ॲड. निरवडेकर हे केवळ लोकप्रतिनिधी नसून मित्रत्व जपणारे, सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि समाजासाठी झटणारे नेतृत्व असल्याच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी जीवनासाठी सर्वांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

यावेळी उत्सवमूर्ती ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, नितीन राऊळ, मायकल डिसोजा, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबूरे, माजी नगरसेवक मनोज नाईक, राजू बेग, विलास जाधव, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles