सावंतवाडी : समता प्रेरणाभूमी संवर्धन समिती, सावंतवाडीच्या वतीने रविवारी तीन मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. समता प्रेरणाभूमीची मासिक सभा रविवारी अध्यक्ष दीपक पडेलकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करून संस्थेच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला.
दरम्यान मे महिन्यात प्रेरणाभूमीचे अध्यक्ष दीपक पडेलकर हे जिल्हा बँकेच्या सरव्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झाल्याने तसेच ममता मोहन जाधव या आजगाव केंद्र शाळेच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्याने तसेच कांता विठ्ठल जाधव यांना कृषी विस्तार अधिकारी पदावर वैभववाडी येथे बढती मिळाल्याने या तिघांचा सामुदायिक सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अध्यक्ष दीपक पडेलकर, कार्याध्यक्ष अंकुश कदम, उपाध्यक्ष भावना कदम, सचिव मोहन जाधव, कार्यकारणी सदस्य वासुदेव जाधव, रश्मी पडेलकर व मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मोहन जाधव यांनी स्वागत केले तर कांता जाधव यांनी आभार मानले.


