पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर ! ; कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी स्वीकारणार वाढदिवसाच्या शुभेच्छा.!

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे सोमवार दि. २३ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढील प्रमाणे आहे – सकाळी ६.३० वा. अधिश निवासस्थान, जुहू, मुंबई येथून मुंबई विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ६.४५ वा. जनरल एविएशन विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव, सकाळी ७.०० वा. जनरल एविएशन विमानतळ, मुंबई येथून विमानाने गोव्याकडे प्रयाण, सकाळी ८.०० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी ९.३० वा. श्रीमती सूचिता शामसुंदर दळवी (पंचायत समिती, माजी सभापती) यांची सांत्वन भेट, सकाळी १०.०० वा. ओम गणेश निवासस्थान कणकवली येथे आगमन राखीव, सायं ५.०० वा. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवानोन्नती अभियान महिला स्वयंसहाय्यता समूह उत्पादने संकलन व विक्री केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.
स्थळ : पंचायत समिती कणकवली, सायं ६.०० वा. मोटारीने गोव्याकडे प्रयाण, सायं ७.१५ वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा गोवा येथे आगमन व राखीव, सायं ७.३० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा गोवा येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण, रात्रौ ८.३० वा. जनरल एविएशन विमानतळ, मुंबई येथे आगमन व जुहूकडे प्रयाण. रात्रौ ८.४५ वा. अधिश निवासस्थान, जुहू येथे आगमन व मुक्काम असे त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles