लीड्स : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात सर्व विकेट गमावून 465 धावा केल्या. इंग्लंड संघाकडून ऑली पोपने सर्वाधिक 106 धावा केल्या. त्याच्याशिवाय हॅरी ब्रूकने 99 धावांची खेळी केली. पहिल्या डावाच्या आधारे भारतीय संघाला 6 धावांची आघाडी मिळाली. भारतीय संघाने पहिल्या डावात 471 धावा केल्या होत्या.
भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 5 विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा एकही विकेट घेऊ शकला नाही. त्याने 23 षटकांत 68 धावा दिल्या. प्रसिद्ध कृष्णाने 20 षटकांत 128 धावा देत 3 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूरने 6 षटकांत 38 धावा देऊन एकही विकेट घेतली नाही.