कणकवली : राज्याचे मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त आज सायंकाळी कणकवली येथील त्यांच्या ‘ओम गणेश’ निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा प्रदान केल्या. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, कार्यवाहक ॲड. नकुल पार्सेकर, सल्लागार हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, सदस्य निलेश धडाम, असोसिएशनचे कार्यालय प्रमुख आग्नेल फर्नांडिस आदि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून नामदार नितेश राणे यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले.
ADVT –


