‘सामाजिक क्रांती’ घडविणारे पहिले राजे म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज ! : धम्मचारी लोकदर्शी. ; इन्सुली येथे शाहू महाराजांना अभिवादन.

इन्सुली : भारतातील अनेक संस्थानामध्ये राजे महाराजे होऊन गेले. त्यांनी आपल्या राज्यांच्या सीमा वाढवल्या जनतेचे रक्षण – पोषण केले ;परंतु समाजातील विषमता प्रस्तापित यंत्रणेविरुद्ध कार्य करणे सर्वांनाच जमू शकले नाही.हे कार्य आपल्या राजकीर्दीमध्ये सामाजिक क्रांती घडवून आणणारे पहिले राजे आरक्षणाचे जनक लोकनेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज असल्याचे प्रतिपादन धम्मचारी लोकदर्शी यांनी इन्सुली येथे शाहू महाराजांना अभिवादन करताना केले.

धम्मचारी लोकदर्शी यांनी महाराजांनी केलेल्या अस्पृष्यता निवारण कायदा,राजकारभारामध्ये अस्पृष्यांसाठी पन्नास टक्के आरक्षण,शिक्षणासाठी केलेले विविध योजना,वसतिगृह,अनाथाश्रम,कुस्ती शाळा बांधणे,महिलांवरील अनिष्ट रुढी-परंपरा निर्मुलन अशा शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.

भीमगर्जना युवक मंडळ इन्सुली, रमाईनगर यांच्या वतीने प.पू.डॅा.बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर येथे शाहू महाराजांची 151वी जयंती साजरी करण्यात आली.प्रारंभी शाहू महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन बुध्दवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी विचार मंचावर मंडळाचे अध्यक्ष लोकदर्शी,उपाध्यक्ष कृष्णा जाधव,सल्लागार राघोबा जाधव उपस्थित होते.कुमारी स्वप्नाली व राघोबा जाधव यांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी थोडक्यात माहीती सांगुन शुभेच्छा दिल्यात.या कार्यक्रमात आनंद जाधव,मिथील जाधव,बाबली जाधव,दिपेश जाधव,रुपाली जाधव,सविता जाधव,संजना जाधव,वृषाली जाधव,अनुजा जाधव,स्मिता जाधव,दिपाली जाधव,गिताली जाधव,लैला जाधव स्म्रितिषा जाधव,सृष्टी जाधव,ललिता जाधव,सानिका जाधव,मनिषा जाधव इत्यादी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अरविंद जाधव व आभार कृष्णा जाधव या़नी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles