सिंधुरक्तमित्रचे विभाग संघटक यशवंत गावडे ठरले ‘देवदूत’! ; गावडेंनी केलेल्या प्लेटलेट दानामुळे वाचले रुग्णाचे प्राण!

  • संजय पिळणकर.
    सिंधुदुर्ग : शुक्रवार दि. २७ जून २०२५ रोजी लक्ष्मी घाडीगांवकर या पेशंटला उपचारासाठी एसएसपीएम मेडीकल कॉलेज लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे येथे प्लेटलेट्सची तातडीने गरज होती. यावेळी या केससाठी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेचे नियमित प्लेटलेट डोनर आणि कुडाळ-वेंगुर्ला विभागीय संघटक यशवंत गावडे यांनी एसएसपीएम मेडीकल कॉलेज पडवे रक्तपेढीत जाऊन अमूल्य असे प्लेटलेट दान केले.
    यावेळी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, रक्तपेढीचे मनिष यादव आदि उपस्थित होते.
    यशवंत गावडे (कुडाळ) यांचे हे तब्बल ३० वे प्लेटलेट दान असून त्यांनी आतापर्यंत ४२ वेळा असे मिळून ७२ वेळा रक्तदान केले आहे.
  • ADVT –
  • https://satyarthmaharashtranews.com/12015/

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles